डॉ. गणपत दराडे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पदोन्नती

सिरसाळा, (प्रतिनिधी) :- पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. गणपत हरिचंद्र दराडे यांची भोकरदन (जि. जालना) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर बदली झाली आहे.

त्यांच्या या निवडीने औरंगपुर गावाच्या एक मानाचा तुरा गेला खोवला आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर या पदापर्यंतचा त्यांचा ३१ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. गणपत दराडे हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत औरंगपूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या गणपत दराडे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत औरंगपुर येथे शिक्षण घेतले पुन्हा पाचवी ते दहावी न्यू हायस्कूल सिरसाळा शिक्षण घेत पुढे अंबाजोगाई व परभणी येथे माध्यमिक शिक्षण येथे झाले आहे. डॉ. गणपत दराडे हे १९९३ मध्ये पोलीस मध्ये प्रथम त्यांची नागपूर, येथे नेमणूक झाली. कालावधी पुर्ण झाल्यानंतर संभाजीनगर, मुंबई, बुलढाणा, येथे त्यांची

नेमणूक करण्यात आली आता पुन्हा डॉ दराडे हे सध्या संभाजीनगर येथील कार्यरत आहेत कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे डॉ. दराडे हे भोकरदन येथील रिक्त जागेवर पदभार घेणार आहेत. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा प्रभारी पदभार अंबडचे डीवायएसपी मुकुंद अघाव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दराडे यांच्या रूपाने आता भोकरदन आणि जाफ्राबाद या दोन तालुक्याला अनुभवी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पदोन्नती पारदर्शक अधिकारी लाभले आहे त्यांच्या ह्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

औरंगपुर येथे फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद साजरा

औरंगपुरची शान आणि भूषण डॉ. गणपत दराडे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पदोन्नती होताच औरंगपुर येथे फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद साजरा केला.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing