नागनाथअप्पा हालगे इंजिनिअरींग कॉलेजच्या प्राध्यापिका अश्विनी चाटे-मुंडे यांना पी. एच. डी. पदवी प्रदान

परळी (प्रतिनिधी):-. परळी येथील नागनाथअप्पा हालगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्राध्यापिका अश्विनी बाबुराव चाटे (मुंडे) यांना नुकतीच राजस्थान येथील श्री. जगदीश प्रसाद झाबरमल टीबरेवाला युनिव्हर्सिटी यांच्याकडून संगणक विभागातील पीएचडी प्रदान करण्यात आली.

कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मधील 'डिटेक्शन अँड लोकलायझेशन ऑफ आयरिस फिचर्स फॉर पर्सन आयडेंटिफिकेशन युझिंग डिजिटल इमेज प्रोसेसिंग टेक्निक्स अँड पैटर्न रिकॉग्निशन अप्रोच' असा त्यांचा संशोधनाचा विषय

होता. याकामी गाईड म्हणून त्यांना प्रा. डॉ. प्रसादु पेड्डी व को- गाईड म्हणून डॉ. सुशीलकुमार होळंबे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्थेच्या अध्यक्षा मा. पंकजाताई मुंडे, संचालिका खा. डॉ. प्रितमताई मुंडे, सचिव श्री. विकासराव डुबे, संचालक श्री. सुरेशजी गिरडे, प्राचार्य डॉ. एम. भास्करराव, पॉलीटेक्नीक प्राचार्य एस. एन. मुलगीर, आय. टी. आय प्राचार्य डी एस महाविद्यालयाचे कराड यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing