बीड जिल्हयाच्या पालकमंत्रीपदी कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई (प्रतिनिधी):-  राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

*पुणे*- अजित पवार

*अकोला*- राधाकृष्ण विखे- पाटील

*सोलापूर*- चंद्रकांत दादा पाटील

*अमरावती*- चंद्रकांत दादा पाटील

*भंडारा*- विजयकुमार गावित

*बुलढाणा*- दिलीप वळसे-पाटील

*कोल्हापूर*- हसन मुश्रीफ

*गोंदिया*- धर्मरावबाबा आत्राम

*बीड*- धनंजय मुंडे

*परभणी*- संजय बनसोडे

*नंदूरबार*- अनिल भा. पाटील

*वर्धा* – सुधीर मुनगंटीवार

News Category: 
Maharashtra

Sharing