*परळीत येण्याआधीच शासन आपल्या दारीच्या पूर्वसंध्येला सरकारने परळीला दिली 140 कोटींची भेट*

*सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील 26 रस्त्यांच्या कामांस 141 कोटी 70 लक्ष रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त*

*धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार*

परळी वैद्यनाथ (दि. 04) - परळीत आज राज्य शासन आपल्या दारी येत असून शासनाने परळीत येण्याच्या पूर्वसंध्येलाच परळीवासीयांना तब्बल 141 कोटी रुपयांच्या विकास कामांची भेट दिली आहे. 

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेमार्फत प्रस्तावित केलेल्या  रस्ते व नाल्यांच्या 26 महत्वाच्या कामांना 141 कोटी 70 लक्ष रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे. 

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. 

दरम्यान आज राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असुन, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सुमारे 1500 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर जिल्ह्यातील तब्बल 22 हजार लाभार्थींना विविध शासकीय योजनांच्या लाभाचे थेट वितरण करण्यात येणार आहे.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing