राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आर्यन कुटे सन्मानित

बीड / प्रतिनिधी : अवघ्या १० व्या वर्षी स्वत:ची कंपनी काढून मनोरंजनाचे वेगवेगळे गेम्स काढून जगभरात पोहोचविणाऱ्या बीड येथील आर्यन सुरेश कुटे याच्या कार्याची दखल घेवून नवभारतचे शिल्पकार पुरस्काराने शनिवारी मुंबई येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे आयोजित केलेल्या एका शानदार सोहळ्यास राज्यपाल रमेश बैस, खा. पुनम महाजन, समुहाचे एम.डी. निमेष माहेश्वरी, ए. श्रीनिवास आदींची उपस्थिती होती. यावेळी मास्टर आर्यन सुरेश कुटे यांच्या कार्याची दखल घेवून नवभारतचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कुटे ग्रुपच्या एम.डी. अर्चना सुरेश कुटे यांची उपस्थिती होती. आर्यन कुटे याने लहान वयात व्यवसायात आपले क्षेत्र निवडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पुरस्काराबद्दल आर्यन कुटेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

News Category: 
Maharashtra

Sharing