होमिओपॅथी उपचार पद्धतीत मोठे परिवर्तन-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी
सध्या अनेक त्याची रुग्णांना दुरुस्त करणारे आहेत सर्वांना गुण येतो रुग्णाला विश्वासही बसतो उपचाराच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी उद्देश एकच असतो तो म्हणजे रुग्ण बरा व्हावा,दुर्धर असणाऱ्या आजारांवर कायमस्वरूपी उपचार पद्धती ही होमिओपॅथी उपचार पद्धती त असल्यामुळे योग्य निदान आणि उपचार पद्धतीत मोठे परिवर्तन घडू लागले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

बीड येथून जवळच असलेल्या मंझरी येथे आदर्श शिक्षण संस्थेचे सोनाजीराव क्षीरसागर  होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या व आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक च्या सौजन्याने राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचा दि.17/03/2024 रोजी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता

समारोप प्रसंगी या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मिलिंद निकुंभ,प्रति कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक,डॉ बाळासाहेब पवार,अध्यक्ष स्थायी समिती, नाशिक,डॉ देवेंद्र पाटील,संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ,नाशिक,युवानेते रोहित दादा क्षीरसागर, ह भ प माऊली महाराज मंझरी कर विलास बडगे, अंबादास गुजर सरपंच रेशमा गुजर उपसरपंच मुस्तफा पठाण सर्जेराव खटाणे, संतोष बनसोडे,महाविद्यालयाचे सल्लागार डॉ.अरुण भस्मे,दूध संघाचे व्यवस्थापक श्रीखंडे,आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गणेश पांगारकर,डॉ वैभव शहापुरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गणेश पांगारकर यांनी केले तर शिबिराचा उद्देश व महाविद्यालयात होत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्राचार्य डॉ गौशाल यांनी दिली

यावेळी विद्यापीठाचे प्रति कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ म्हणाले की, मेडिकल फार्मा इंडस्ट्री मध्ये ज्यांना संशोधन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आता स्वतंत्र कोर्स सुरू करण्यात येणार आहेत नवीन फेलोशिप कोर्सही आता सुरू होत असून विविध विभागाचे शिक्षण विद्यापीठाच्या मार्फत विद्यार्थी घेऊ शकतील असे उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू होत आहेत होमिओपॅथी करून इतर शिक्षणामध्ये देखील विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून सीसीएमपी सारखे कोर्स करून ऍलोपॅथी प्रॅक्टिस करता येईल त्यामुळे विद्यार्थ्यांना मेडिकल शिक्षणात मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी
डॉ देवेंद्र पाटील,डॉ बाळासाहेब पवार,डॉ अरुण भस्मे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सध्या विविध प्रतींच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार पद्धती सुरू आहे अनेक रुग्ण दुरुस्त होत असतात अनेकांना गुणही येतो विश्वास बसतो उपचाराच्या पद्धतीने वेगवेगळ्या असल्या तरी उद्देश मात्र एकच आहे तो म्हणजे रुग्ण बरा व्हावा,योग्य निदानाची पद्धत सुद्धा वेगवेगळी बदलू लागली आहे रोगाचा नायनाट हाच होमिओपॅथीचा उद्देश असतो होमिओपॅथीमध्ये योग्य निदान आणि उपचार करून मोठे परिवर्तन घडू लागले आहे कमी वेळेत कमी खर्चात योग्य उपचार आता सहज उपलब्ध होऊ लागले आहेत मनुष्याचे नाते एकमेकांशी जोडण्याचे काम अशा शिबिरांच्या माध्यमातून केले जात असतात ग्रामीण भागाशी संपर्क होतो,लोकांचे प्रबोधन होते,होमिओपॅथी औषधी किती प्रभावी आहे हे उपचार घेतल्यावरच कळते, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून राष्ट्रीय शिबिर योजना काम करते सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे अतिशय दुर्धर अशा रोगावर होमिओपॅथी मध्ये उपचार केले जातात त्यामुळे या पॅथीला आता राजश्रय मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले क्षण क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होऊ लागले आहे पालकांनी फक्त डॉक्टर, इंजिनियर एवढ्यावरच न थांबता इतर क्षेत्रातही आपल्या पाल्यांना संधी द्यायला हवी सध्याच्या युगात मोबाईल आणि नवीन तंत्रज्ञान यामुळे विद्यार्थ्यांना जगाचा इतिहास मिनिटात माहीत होऊ लागला आहे त्यामुळे त्याचा फायदा स्वतःच्या शैक्षणिक विकासासाठी आणि ज्ञानात भर घालण्यासाठी व्हावा या भागातील अनेक गावे डोंगरी विभागामध्ये समाविष्ट करून घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या सवलती मिळत आहेत त्यामुळे भविष्यातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांची निवड करून संधीचा फायदा घ्यावा असे ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे आभार धनंजय तागड यांनी मानले या शिबिरासाठी मंजरी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

News Category: 
Beed

Sharing