पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

*बीड मतदारसंघातील बुथ प्रमुख, वाॅरिअर्स, पदाधिकाऱ्यांचीही होणार बैठक*

बीड, :- लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते उद्या (ता.०५) बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. उद्घाटनानंतर बीड मतदारसंघातील बुथ प्रमुख, वाॅरिअर्स आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक त्या घेणार आहेत. यावेळी खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. 
     जिल्हा प्रचार कार्यालय शहरातील संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, जालना रोड, येथे सुरू करण्यात आले आहे. उद्या सकाळी १०.३० वा. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचा शुभारंभ  करण्यात येणार आहे. यावेळी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, शिवसेना नेते अनिल जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सचिन मुळूक,रिपाइंचे नेते पप्पू कागदे, रासपचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मातकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी   मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप महायुती प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

*बीड मतदारसंघाची बैठक*
-----
जिल्हा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर  पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड मतदार संघातील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सुपर वॉरियर्स, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, जि.प. सदस्य, सरपंच, उपसरपंच तथा सर्व  कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक कै. तुकाराम गुरूजीनगर, मस्के कन्स्ट्रक्शन प्लांट, चऱ्हाटा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
••

News Category: 
Beed

Sharing