*केंद्रीय नेत्यांनी सुचवून देखील राज्य नेतृत्वाने मंत्री छगनराव भुजबळ यांना उमेदवारी लवकर जाहीर न केल्याने ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांनी केला महायुती सरकारचा निषेध*

बीड / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना. छगनराव भुजबळ नाशिक लोकसभा लढविणार असल्याची घोषणा केली. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारने लोकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले तरी ना. छगनराव भुजबळ यांची उमेदवारी जाहीर न केल्यामुळे ना.भुजबळ साहेबांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे ना. छगनराव भुजबळ यांची उमेदवारी जाहीर न करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड शाखेच्या वतीने काळ्या फीती बांधून जाहीर निषेध करण्यात आला आहे.
बीड येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत काळ्या फीती बांधून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माहिती सरकारचा जाहीर निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना. छगनराव भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवावी असे आदेश महायुतीच्या नेत्यांना दिले होते. मात्र ओबीसी नेत्याला कशाला मोठे करायचे? या द्वेशापाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आला तरी ना. छगनराव भुजबळ यांची उमेदवारी जाहीर केली नाही. मध्यंतरीच्या काळात ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण होऊ लागल्याने ना. भुजबळ साहेबांनी राज्यात विविध ठिकाणी लाखोंच्या सभा घेऊन या अतिक्रमणाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ओबीसी नेत्याला कशाला मोठे करायचे या द्वेशापाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी भुजबळ साहेबांची उमेदवारी मुद्दामहून जाहीर केले नाही. यामुळे ना. छगनराव भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचे देशातील ओबीसी बांधवांनी स्वागत केले असून जळाऊ वृत्तीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. यावेळी समता परिषदेचे शहराध्यक्ष निखिल शिंदे, माळी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष धनंजय काळे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी आणि समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News Category: 
Beed

Sharing