आज संध्याकाळी भीमजल्लोष ; कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहा- आ. संदीप क्षीरसागर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श शिंदेंच्या भीमगीतांचा कार्यक्रम 
 

बीड दि.२२ (प्रतिनिधी)  :-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपास्थीत राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे.
                दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडून आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मंगळवार, दि.२३ एप्रिल रोजी सांयकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (स्टेडियम) या ठिकाणी होणार आहे. 

महिला व पत्रकार असणार विशेष बैठक व्यवस्था 

दरम्यान या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिला भगिनी व पत्रकार बांधव यांच्यासाठी स्वतंत्र  आणि विशेष बैठक व्यवस्था असणार आहे. जेणेकरून महिला भगिनी या कार्यक्रमाचा व्यवस्थित आनंद घेऊ शकतील असे नियोजन असणार आहे.

News Category: 
Beed

Sharing