जाती पातीच नाही तर विकासाच राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या:-अशोक हिंगे

बीड (प्रतिनिधी )जाती पाती च नाही तर विकासा च राजकारण करणाऱ्या वंचित सोशिताच्या कामी येणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केले ते वडवणी, व नेकनूर येथील प्रचार सभेत बोलत होते 

 महाराष्ट्र मध्ये महायुती व महाविकास आघाडी कडून जातीपातीचे राजकारण चालू आहे विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोलत नाही महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे मुद्दे सोडून जातीपातीचा राजकारण करून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न महायुती व महाविकास आघाडी कडून केले जात आहे मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असलेले प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सतत वंचित शोषितांच्या प्रश्नावर काम करत आली आहे देशातील मोदी सरकारने एकीकडे महागाई वाढवली आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे कांद्यावर निर्यात बंदी घालून शेतकऱ्याला अडचणी टाकले आहे गेली अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील रेल्वे चा प्रश्न  खितपत पडला आहे जिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या नाहीत अनेक गावात पिण्याचे पाणी नाही किंवा चांगले रस्ते नाहीत  हे काम आतापर्यंतच्या खासदाराने का केले नाही असा प्रश्न उपस्थित करत माहायुती, महाविकास आघाडी हे फक्त जातीचे राजकारण करतात असे सांगत विकासाचे राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या आसे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केले आहे वडवणी व नेकनुर येथे मतदारातून अशोक हिंगे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पंचकोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

News Category: 
Beed

Sharing