*बीटीएस परिक्षेचे आयोजन*

बीड (प्रतिनिधी): पाल्यांमधील गुणवत्ता लक्षात घेऊन त्याचा कोणत्या शाखेत कल आहे हे समजावे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन करता यावे यासाठी समता सेवाभावी संस्थेच्या वतीने बीड टॅलेंट सर्च परिक्षेचे दिनांक ०५ मे २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा विनामुल्य राहणार आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल लक्षात घेणे, तसेच त्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन होण्यासोबतच त्यांच्यात स्पर्धा परिक्षेची इच्छा जागृत व्हावी यासाठी समता सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत बीड टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित केली आहे. सामान्य गणित, विज्ञान,बुद्धीमत्ता चाचणी,सामान्यज्ञान, इंग्रजी व्याकरण आदी विषयांवर आधारीत वर्गनिहाय अभ्यासक्रम तयार करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेसाठी विनामुल्य प्रवेश असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती सौ. पल्लवी देशपांडे आणि श्री. भालचंद्र देशमुख यांनी दिली. या परिक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष, समता सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालक आणि शाळांना 7843004545,8830578484 या क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उपलब्ध संधीचा फायदा घेता येईल.

News Category: 
Beed

Sharing