लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची भव्य रॅली..! बीडकरांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे – नवनाथ शिराळे

बीड (प्रतिनिधी):- बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा – महायुतीच्या अधिकृत उमेदवार भाजपा राष्ट्रीय सचिव  पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, दुपारी बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेकर पुतळ्यापासून ते माने कॉम्प्लेक्स पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तसेच रॅली नंतर जाहीर सभा संपन्न होणार आहे. या रॅलीमध्ये बीड शहरातील नागरिकांनी मोठ्या संखेने सहभागी होऊन भाजपा उमेदवार पंकजाताई मुंडे यांना पाठींबा द्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सचिव तथा नगरपालिका माजी सभापती नवनाथ शिराळे पाटील यांनी केले आहे. 
महाविजय २०२४ पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करण्यासाठी बीड मधून पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी व महायुतीचे घटक पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिल्ह्यातील मतदार बांधवांशी संपर्क सुरु केला आहे. सर्व स्तरातून प्रचंड पाठींबा मिळत आहे.

News Category: 
Beed

Sharing