महाराष्ट्र दिनी ना. छगनराव भुजबळ यांच्या शुभहस्ते हॉटेल सनराईज एक्झिक्युटिव्हचा पुनरउभारणी सोहळा

पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी खा. समीरभाऊ भुजबळ यांची राहणार विशेष उपस्थिती

बीड / प्रतिनिधी
बीड शहरापासून जवळच असलेल्या धुळे सोलापूर महामार्गावरील नामलगाव फाटा येथे पुनरउभारणी करण्यात आलेल्या हॉटेल सनराइज् एक्झिक्युटिव्ह प्युअर व्हेज रेस्टॉरंट अँड लॉजिंगचा शुभारंभ सोहळा महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे 2024 रोजी दुपारी 12 : 30 वाजता राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून या शुभारंभ सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत व राऊत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
या पुनरुभारणी सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे आणि माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

News Category: 
Beed

Sharing