आंबेडकर जयंती महोत्सवास भेटी देत अशोक हिंगे यांनी साधला मतदारांशी संवाद

अशोक   हिंगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार 

 बीड (प्रतिनिधी ) बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी काल केज तालुक्यातील विविध ठिकाणच्या आंबेडकर जयंती महोत्सवास भेटी देत मतदारांशी संवाद साधला यावेळी मतदारांनी हिंगे यांना मोठ्या मताधिक्याने विजय करून संसदेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला 

 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या नियोजनबद्ध प्रचाराने  महायुती महाविकास आघाडी च्या उमेदवाराना धडकी  भरली असून अशोक हिंगे पाटील यांना प्रत्येक गावातून जातीभेद विसरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार हे जातीपातीचे राजकारण करत आहेत हे सुज्ञ मतदारांनी ओळखले आणि पुरोगामी महाराष्ट्रात जातीच्या राजकारणला थारा नाही म्हणून महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला घरी बसऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजय करून संसदेत पाठवायचेच असा निर्धार प्रत्येक गाव खेड्यातील मतदार बोलून दाखवत आहे काल अशोक हिंगे पाटील यांनी आडस  सोनवळा, मुलेगाव भावठाणा, केज, मसाजोग, ,गांजी आदी गावच्या आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रमास भेटी दिल्या व मतदारांशी संवाद साधला यावेळी गावागावात हिंगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले .प्रत्येक गावातून सर्व जाती धर्मातील लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या अशोक हिंगे पाटलांना संसदेत पाठवायचेच असा निर्धार मतदारांनी बोलून दाखविला यावेळी प्रत्येक ठिकाणी हजारो मतदारांची उपस्थिती दिसून आली

News Category: 
Beed

Sharing