वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर उतरले रणांगणात

दिनांक 3 मे रोजी अंबाजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा 

 बीड (प्रतिनिधी ) बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ एड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी दंड थोपटले असून झंजावाती प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत दिनांक 3 मे रोजी आंबे जोगाई येथील मार्केट ग्राउंड वर आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे तरी सभेस जिल्ह्यातील मतदार बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा आव्हान अशोकराव हिंगे पाटील यांनी केले आहे 

 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू असून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा प्रचार वेगात सुरू आहे अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आता बीड जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दंड थोपटले असून रणांगणात उतरले आहेत बाळासाहेब आंबेडकर दि.2 मे रोजी बीड जिल्ह्यात मुक्कामी येत असून ते अनेक नेते कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार चर्चा करून संवाद साधणार आहेत यामुळे जिल्ह्यात अनेक घडामोडी घडवून प्रचारात रंगत येणार आहे दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई येथील मार्केट ग्राउंड वर संध्याकाळी 5:00 वाजता सभा सुरू होईल तरी जिल्ह्यातील सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनी भव्य दिव्य होणाऱ्या जाहीर सभेस मोठ्या संख्येने  उपस्थित राहून विजयाचे शिल्पकार व्हावे असे आव्हान बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांनी केले आहे

News Category: 
Beed

Sharing