बीड येथील हज यात्रेकरूंसाठी मेंदज्वर तापाचे लसीकरण शिबिर

सर्व हज यात्रेकरूंनी लाभ घ्यावा :  खादमीन हजाज कमिटी बीड 

 बीड (प्रतिनिधी):- 

 खादमीन हजाज कमिटी बीडतर्फे यावर्षीही या वर्षी पवित्र हजला जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी मेंदूज्वर तापाचे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर शिबिर रविवार, 12 मे 2024 रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे.  ही लस (डोस) सर्व हज यात्रेकरूंसाठी अनिवार्य आहे.  हज यात्रेकरूंनी 12 मे रोजी डोस घेण्यासाठी येताना त्यांचे आय-कार्ड (ओळखपत्र) सोबत आणावे.  आय कार्ड उपलब्ध नसल्यास कव्हर हेड सोबत आणावे . हे शिबिर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.  सर्व हज यात्रेकरूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे या वर्षातील चौथे आणि शेवटचे प्रशिक्षण सत्र (हज तरबियती नशिष्त ) 23 मे 2024 रोजी अमन लान्स बीड येथे सकाळी 10 ते 6 वाजे पर्यंत आयोजित केले आहे.  हज यात्रेकरूंनी नमूद केलेल्या दोन्ही ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन खादमीन हजाज कमिटी बीडचे अध्यक्ष  मुहम्मद जमील उर्फ ​​जे के मोबाईल क्रमांक 9970532168 व सचिव महंमद फारुक इरफान 
 9422331972 यांनी केले आहे . तसेच तालु्यातील ईतर ठिकाणी सदर शिबीर तालुका स्तरावर होईल. अधिक माहितीसाठी  वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

News Category: 
Beed

Sharing