मिशन यूपीएससी परीक्षेत अलहुदा हायस्कूल ची आयशा तकदीस राज्यात प्रथम

बीड सेंटरच्या अनेक विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

 
 बीड (प्रतिनिधी) :- निगहेबान फाऊंडेशन बीड आणि अल फैज फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, 10 मार्च 2024 रोजी राज्य स्तरावर अनेक जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या परीक्षांमध्ये बीड केंद्राने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.  अलहुदा हायस्कूल, बीड येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आयशा तकदीस शेख मोईजुद्दीन हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 
  बीड, अमरावती, जळगाव, अकोला, परभणी आणि नंदुरबार येथून हजारो विद्यार्थी मिशन यूपीएससी परीक्षेत बसले होते.  बीड शहरातील विविध शाळांतील 7वी व 9वीच्या एकूण 199 विद्यार्थ्यांनी बीड केंद्रातून या वर्गात सहभाग घेतला, त्यापैकी 146 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
 राज्य स्तरावर, बीड 01 गट 7 वी मधून उत्कृष्ट निकाल आला -
त्याचप्रमाणे सय्यद मेहरीन अंजुम सय्यद माजिदुद्दीन अलहुदा उर्दू हायस्कूल बीड ची विद्यार्थिनी इयत्ता आठवीतून जिल्ह्यात प्रथम, अर्मीश फातिमा सय्यद फुरकान मिल्लिया कन्या विद्यालय बीड इयत्ता सातवीतुम जिल्हयात प्रथम, मोमीन आयदा अरबश मुहम्मद शफीउद्दीन मिल्लीया कन्या विद्यालय इयत्ता नववीमधून जिल्ह्यात प्रथम आली. , अदीब बागवान इलियास बागवान मिल्लीया बॉईज हायस्कूल जिल्हास्तर प्रथम, सय्यद अफिरा फातिमा सय्यद आरिफ मिल्लीया गर्ल्स स्कूल जिल्हास्तर द्वितीय, अदिना सारा मरघुब अलहुदा उर्दू प्राथमिक शाळा जिल्हास्तर तृतीय, सय्यद कहेकशा सय्यद लतीफ मिल्लीया गर्ल्स हायस्कूल जिल्हास्तर तृतीय येऊन त्यांनी आपले क्षमता सिद्ध केले.   हा वर्ग आणि परीक्षा शहरातील मिल्लीया बॉईज हायस्कूलमध्ये घेण्यात आली .  UPSC मिशन अंतर्गत, निगहेबान फाऊंडेशन बीडचे प्रमुख मुजतबा अहमद खान आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांना अभ्यास वर्गांद्वारे तयार करण्यासाठी आणि परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले.
 या कार्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व टीम सदस्यांचे - मुख्याध्यापक, प्रभारी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे निगहेबान फाऊंडेशन कृतज्ञ आहे.
 मिशन यूपीएससी मिशन बीड केंद्रासाठी अंजुमन ईशात-ए तालीम बीडचे सचिव खान सबीहा बाजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा निगहेबान फाऊंडेशन बीड आणि अल फैज फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  आशा आहे की नवीन वर्षात उर्दू माध्यमाच्या शाळा यावर्षी या अभियानात मोठया संख्येने सामील होतील जेणेकरून त्यांचे विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षांना सामोरे जातील.

News Category: 
Beed

Sharing