*ना.धनंजय मुंडे साधणार संवाद परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन!*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
     राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मुख्य मार्गदर्शनाखाली परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन उद्या सोमवारी करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.
         ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालय समोरील प्रांगणात  उद्या सोमवार दिनांक 9 मे रोजी सायंकाळी 6 वाजता  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहराची महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत  ना.धनंजय मुंडे  सर्वांशी संवाद साधणार आहेत.तसेच आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व आजी-  माजी नगरसेवक,विविध आघाडीचे पदाधिकारी,राष्ट्रवादी प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing