*पंकजाताई मुंडेंच्या परळीत मॅरेथॉन बैठका ; बुथ प्रमुखांशी साधला थेट संवाद*

परळी :  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरात विविध प्रभागातील कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठका घेत बुथ प्रमुखांशी थेट संवाद साधला. भाजपच्या संघटनात्मक कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
   आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपरिषदेच्या देखील निवडणूका होणार आहेत. त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील विविध प्रभागातील शक्ती केंद्रप्रमुख, प्रभारी आणि बुथ प्रमुखांच्या यशःश्री निवासस्थानी बैठका घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. शहरातील राजकीय परिस्थिती, सामाजिक गणितं, नागरिकांच्या अडी अडचणी व समस्या त्यांनी जाणून घेतल्या. भाजपच्या शहरातील संघटनात्मक कार्याचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला.  कोणताही मध्यस्थ न ठेवता त्यांनी बुथ प्रमुखांशी थेट व मनमोकळा  संवाद साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. 
*उद्या ग्रामीण भागाचा आढावा*
पंकजाताई मुंडे उद्या सकाळी परळी व अंबाजोगाईच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गटाच्या शक्ती केंद्रप्रमुख,  प्रभारी व बुथ प्रमुखांशी थेट संवाद साधणार आहेत अशी माहीती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
••••

News Category: 
Parli Vaijnath

Sharing