*बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे-डॉ.संतोष मुंडे*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील व परळी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी उद्योग उभारण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे. 
            याबाबत अधिक माहिती अशी की, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, बीड कार्यालया मार्फत  बेरोजगारांना उत्पादन उद्योग  व सेवा उद्योगांसाठी  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना गेल्या तीन वर्षापासून राज्यात राबविण्यात येत आहे.  सदर योजनेअंतर्गत सेवा उद्योगांसाठी रु. 10.00 लक्ष मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगांसाठी रु. 50.00 लक्ष पर्यंत बँके मार्फत अर्थसहाय्य  दिले जाते.  सदर योजनेअंतर्गत या कार्यालयाकडून  बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर जास्तीत जास्त 35 टक्यापर्यंत (जात प्रवर्ग / उद्योग कार्यक्षेत्रानुसार) अनुदान देय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : पासपोर्ट फोटो, आधार  कार्ड, पॅानकार्ड, वयाचा दाखला TC, मार्कशिट, व्यवसाय प्रकल्प अहवाल, आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्र व ग्रामीण भागासाठी लोकसंख्या दाखला इ., इच्छुक अर्जदारांनी  आवश्यक कागदपत्रांसह (maha-cmegp.gov.in) या वेबसाईटवर बीड व परळी विधानसभा मतदारसंघातील युवकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष  डॉ.संतोष मुंडे (9822280568) यांनी केले आहे.

*वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे अर्ज करावे-डॉ. मुंडे*

 "येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयामार्फत ९ मे पासून १ लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गत अर्ज वाटप सुरू झाले आहे. इच्छुक अर्जदारांनी स्वत: जातीचा दाखला आधार कार्डची झेरॉक्स सोबत घेऊन बीड येथील सामाजिक न्याय भवन येथील महामंडळाच्या कार्यालयात येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing