प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे गुरुवारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार समारंभात उदघाटन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

परळी वैजनाथ
       शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या हेअर, स्कीन आणि मेकअप अशा विविध सेवा एकाच छताखाली असलेल्या प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे उद्या गुरुवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या शुभ हस्ते उदघाटन होणार आहे. या समारोहला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक ज्ञानोबा सुरवसे, सौ. प्रतिभा सुरवसे आणि नगरसेविका सौ. उमाताई समसेट्टी यांनी केले आहे.
       उद्या गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता समसेट्टी निवास, प्रेमपन्ना नगर, आयसीआयसीआय बँकेच्या समोर हा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे.
       शहराच्या सौंदर्य क्षेत्रात यामुळे मोठी भर पडणार आहे. प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक सुरवसे यांनी तब्बल तीन वर्षे पुणे येथे मेकअप, स्कीन आणि विविध सौंदर्य शास्त्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. हेअरस्टाईल संबंधित अतिशय आधुनिक प्रशिक्षण हे मुंबईमध्ये सुमारे एक वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून प्रतिक सुरवसे हे त्यांच्या आईच्या ब्युटी पार्लरमध्ये चांगले काम करीत आहेत. अतिशय कमी वयात त्यांना याच क्षेत्रात काम करण्यासाठी बाहेर देशात संधी आली होती परंतु कोरोनामुळे अडचण आली.

       आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा आपल्याच भागात उपयोग व्हावा या उद्देशाने प्रतिक सुरवसे यांनी परळी प्रतिक्स मेकअप स्टुडिओ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या क्षेत्रात पुरूषांनी उतरून काम करणे हे कौतुकास्पद आहे. प्रतिक्स मेकअप स्टुडिओमुळे शहराच्या सौंदर्य क्षेत्रात अतिशय मोलाची भर पडणार आहे. या उदघाटन सोहळ्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक सुरवसे, सौ. प्रतिभा सुरवसे, नगरसेविका सौ. उमाताई समसेट्टी यांनी केले आहे.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing