*पंकजाताई मुंडे पोहोचल्या थेट बांधावर ; शेतकऱ्यांचे पुसले अश्रु*

*अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी ; तातडीने नुकसान भरपाई देण्याची केली मागणी शासनाला*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रु पुसले तसेच त्यांना धीर दिला. पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

  तालुक्यात गारपिटीसह झालेल्ता अवकाळी पावसाने सेलू, गाढे पिंपळगाव, वडखेल, पांगरी, सिरसाळा, रेवलीसह बऱ्याच ठिकाणी शेतपिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके अक्षरशः जमिनदोस्त झाली.  हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे  यांनी आज सेलू परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून प्रभावित क्षेत्रातील शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाकडे मागणी केली असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing