*आ.धनंजय मुंडेंमुळे हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार:रमाई घरकुल योजनेचा १० कोटी २२ लक्ष रुपये निधी न.प.ला प्राप्त - बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):-  रमाई घरकुल योजनेच्या ३३४ व १०८ या मंजूर विकास आराखड्याचे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी न.प.ला प्राप्त झाले आहेत.परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते विकासपुरुष आ.धनंजय मुंडे  यांच्यामुळे हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
          ३३४ व १०८ या मंजूर विकास आराखड्याचे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी नगर परिषदेला प्राप्त झाला आहे.राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आ.धनंजय मुंडे  यांच्या सहकार्यातून त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले "रमाई घरकुल योजनेचे" मंजूर डीपीआर चे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी नगर परिषदेस प्राप्त झाला.हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे विकासपुरुष आ.धनंजय मुंडे यांच्यामुळे हे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. परळी शहर व मतदारसंघातील विविध विकासकामांचा ध्यास घेऊन आ.आ.धनंजय मुंडे यांनी सर्वच विकासकामांना भरभरून निधी उपलब्ध करून दिला आहे.परळी शहरातील महत्त्वपूर्ण असा घरकुलांचा विषय मार्गी लावून हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या अनुषंगानेच राज्याचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना  आ.धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर"रमाई घरकुल योजनेचा" डीपीआर मंजूर करण्यात आला. या मंजूरडीपीआर चे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी नगर परिषदेस प्राप्त झाले. याबद्दल तमाम परळीकरांच्या वतीने आ.धनंजय मुंडे यांचेमाजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

News Category: 
Parli Vaijnath

Sharing